कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळ, परळी वैजनाथ संचालित.

कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी-वै.

Admission Info

Download Admission Form...




  • महाविद्यालयात प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विध्यार्थीनीने परीक्षेचा निकाल लागल्यानंतर २० दिवसाच्या आतप्रवेश पत्रिकेद्वारे प्राचार्यांकडे अर्ज करावा.

  • प्रवेश पत्रिका आणि माहिती पुस्तिका महाविद्यालयाच्या कार्यालयातून रविवार व सुट्टीच्या दिवसा व्यतिरिक्त अन्य दिवशी कार्यालयीन वेळेत रु. ५०/- भरून मिळवता येईल.

  • प्रथम सर्व प्रवेश हे हंगामी स्वरूपाचे असतील. प्रवेशाबाबत काही उणीवा आढळून आल्यास असे प्रवेश रद्द केले जातील व कुठल्याही विध्यार्थीनीचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याचा अधिकार प्राचार्यांना आहे.

  • त्यासाठी कारणे दाखवण्याची आवश्यक राहणार नाही तसेच विध्यार्थीनीच्या महाविद्यालयातील प्रवेश अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय प्रवेश अंतिम समजण्यात येणार नाही.












  • शाळा/संस्था/महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.)

  • मागील परीक्षेचे गुणपत्रक.

  • मागासलेल्या जाती किंवा जमातीतील वर्गीकृत जाती जमातीतील असल्यास त्यासंबंधीचेतहसील कार्यालयाने दिलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत.

  • पात्रता प्रमाणपत्र (फक्त प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थिनीसाठी)

  • स्थलांतर प्रमाणपत्र (जर विध्यार्थीनी दुसर्या बोर्डाकडून अथवा विद्यापीठाकडून प्रवेश घेऊ इच्छित असेल तर)

  • ई.बी.सी., स्कॉलरशिप चा आदेश क्रमांक.

  • वरील आवश्यक प्रमाणपत्राच्या मुल प्रती व प्रत्येक चार सत्यप्रती द्याव्यात

  • स्कॉलरशिप धारकांनी पासपोर्ट फोटो ४ प्रती व इ.बी.सी. धारकांनी ३ प्रती जोडाव्यात.








* बक्षीस *

  • १२ वी कला शाखेतून सर्वप्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला कै. देविदासराव गोविंदराव आराध्ये यांचे स्मरणार्थ रु.१००० रोख बक्षीस.

  • १२ वी विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला कै. सत्यभामाबाई देविदास आराध्ये यांचे स्मरणार्थ रु.१००० रोख बक्षीस.

  • बी.ए. तृतीय वर्षातून प्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला कै. संतुकराव देशमुख यांचे स्मरणार्थ रु.५०१ रोख बक्षीस.

  • बी.एस्सी. तृतीय वर्षातून प्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला कै. लक्ष्मीबाई देशमुख यांचे स्मरणार्थ रु.५०१ रोख बक्षीस.

  • बी. कॉम. तृतीय वर्षातून प्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला सौ. प्रभावती शामकांत जहागीरदार यांच्यातर्फे रु.५०१ रोख बक्षीस.

  • बी.एस्सी. तृतीय वर्षातून गणित विषयात प्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला डॉ. एम.बी. जोशी यांच्यातर्फे रु.५०१ रोख बक्षीस.

  • बी.एस्सी. तृतीय वर्षातून गणित विषयात प्रथम येणाऱ्या विध्यार्थीनीला कै. श्यामरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. विध्याताई देश्पांडे (देशमुख) यांच्यातर्फे रु.५०१ रोख बक्षीस.














  • पुस्तकांच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रंथालय कार्ड व ओळखपत्र आवश्यक आहे.

  • एकावेळी फक्त २ पुस्तके ८ दिवसांकरिता मिळतील.

  • पुस्तके फाटल्यास किंवा गहाळ केल्यास पुस्तकांची दीडपट किंमत भरावी लागेल.

  • वार्षिक परीक्षेपूर्वी पुस्तके परत करावीत.










* फी संबंधी *






* शासकीय गुणवत्ता शिष्यवृत्ती *

  • विध्यार्थिनीना १२ वी विज्ञान व कला या वर्गात गणित वा भौतिकशास्त्र या विषयांना ६०% पेक्षा जास्त गुण असल्यास वरील शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. अशा विध्यार्थिनीचा अर्ज प्राचार्याच्या सहीने संबंधित खात्यास पाठवला जातो.












* सवलती *

  • बी.ए./बी.एस्सी./बी. कॉम. प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थिनीसाठी खालील सवलत जाहीर करण्यात येते.

  • १२ वी ला ७५% पेक्षा अधिक गुण असणार्या विध्यार्थिनी ला शैक्षणिक शुल्कात ५०% सवलत देण्यात येईल.

  • वरील सवलतीचा फायदा फक्त त्याच विध्यार्थिनी ला मिळेल. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १५,०००/- पर्यंत असेल व ज्यांना ई.बी.सी. वा अन्य सवलती नसतील.




copyright @ lldmmparli.in
contact WebMaster